बेळगाव : देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे आयोजित चेंबरच्या माजी अध्यक्षांचा सत्कार समारंभ काल उत्साहात पार पडला.
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (बीसीसीआय) क्रियाशील उत्साही अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल आणि त्यांच्या कार्यकारिणीने स्वातंत्र्य दिनानिमित्त काल मंगळवारी चेंबरच्या माजी अध्यक्षांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. उद्यमबाग येथील चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या रावसाहेब गोगटे सभागृहामध्ये आयोजित या समारंभात चेंबरचे माजी अध्यक्ष प्रेमचंद लंगडे, गोविंद फडके, विकास आर. कलघटगी, विनय जठार, बसवराज जवळी आणि रोहन जुवळी यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. चेंबरचे विद्यमान अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल यांच्या हस्ते हा सत्कार पार पडला. सदर समारंभास व्यापार, वाणिज्य आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उद्योजक, व्यापारी आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta