Friday , November 22 2024
Breaking News

दोन आंतरराज्य ट्रॅक्टर चोरांना अटक; कुडची पोलिसांची कारवाई

Spread the love

 

रायबाग : दोन आंतरराज्य चोरट्यांना अटक करून चोरलेले ट्रॅक्टर, एक टिलर आणि दुचाकी कुडची पोलिसांनी जप्त केली.
रायबाग तालुक्यात अलीकडे चोरीच्या घटना वाढत आहेत. ट्रॅक्टर चोरीबाबत कुडची पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान पीएसआय एस. बी. खोत यांनी दोन आंतरराज्य चोरांना अटक करून त्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर इंजिन क्रमांक : एपी-25, जी- 3118, त्याची किंमत 4,00,000/- रु. आणि टेलर क्रमांक: केए-23, टीसी-6151, ज्याची किंमत 80,000/- रु. आहे, जप्त केले. तसेच कुडची पोलीस स्टेशनमध्ये दाखल आणखी एका गुन्ह्यात न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर इंजिन क्र.6-23,-2363. 4,00,000/- रु. असे एकूण 8,80,000/- रु. किंमतीचे ट्रॅक्टर जप्त केले आहेत. चोरीसाठी वापरलेली 40,000/- रु किंमतीची हिरो कंपनीची स्पेंडर मोटरसायकल क्र. एमएच-15, एसी-2588 जप्त केली.
बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक अथणी उपविभाग, अथणी सर्कल इन्स्पेक्टर हारुगेरी सर्कल यांच्या मार्गदर्शनाखाली कुडची पोलीस स्टेशनचे पीएसआय मलप्पा पुजारी व एस. बी. खोत तसेच जिल्हा तांत्रिक विभागाचे एल. डी. सद्दी, एस. ए. पाटील, आरिफ मुतनाळ, अनिल पाटील, विनोद ठकन्नवरा, पी. एस. बबलेश्वर, एस. बी. डेंगेन्नवर आणि सचिन पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास केला.

About Belgaum Varta

Check Also

भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना

Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *