Tuesday , March 3 2026
Breaking News

राहुल जारकीहोळी अडकले बिम्सच्या लिफ्टमध्ये!

Spread the love

 

बेळगाव : येथील जिल्हा रुग्णालयाची लिफ्ट अचानक बंद पडल्याने जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांचा मुलगा व युवा नेते राहुल जारकीहोळी ३० मिनिटांहून अधिक काळ लिफ्टमध्ये अडकले.

नागापंचमीनिमित्त जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना दूध वाटपाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते. यावेळी रुग्णांसाठी राखीव असलेल्या लिफ्टमधून वरच्या मजल्यावर जाताना लिफ्ट अचानक अर्ध्यावरच बंद पडली.

यावेळी महिला नेत्यांसह राहुलच्या काही साथीदारांना लिफ्टमध्येच अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ काढावा लागला. ही बाब बिम्सच्या कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी लिफ्टचा दरवाजा उघडून राहुल जारकीहोळी व त्याच्या साथीदारांना बाहेर काढले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *