क्रांती फाउंडेशन बेळगाव व भारतीय संस्कृती फाउंडेशनचा अप्रतिम उपक्रम
बेळगाव : मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी मंडळ हायस्कूलमध्ये भारतीय संस्कृती फाउंडेशन बेळगाव व क्रांती फाउंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त माध्यमातून मंडोळी हायस्कूल येथे व्यक्तिमत्व विकास, सायबर गुन्हेगारी, बाल हक्क कायदे, त्याचसोबत विद्यार्थ्यांनी आपलं शैक्षणिक जीवन कसे यशस्वी करावे या विषयावरती कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक नवी व उन्नत दिशा दाखवण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात आला. यावेळी बाल अधिकार, सायबर गुन्हेगारी, महिला व मुलांशी संबंधित असलेल्या कायद्यांबद्दल सोप्या व सुंदर शब्दांमध्ये मुलांना समजावून सांगितले. मुलांनी स्मार्टफोनचा वापर मोजका व सकारात्मक दृष्टिकोनाने कसा करावा हेही त्यांनी सांगितले. मुलांनी समाजामध्ये व्यसनाच्या अधीन जाण्यापासून कसे वाचावे व व्यसनाच्या अधीन झालेल्या व्यक्तींनी व्यसनमुक्त होण्याचे उपाय त्यांनी विद्यार्थ्यांशी हसत खेळत संवाद साधून सांगितले. भारतामध्ये दर दिवसाला दोनच्या एका सर्वेनुसार मिनिटाला चार विद्यार्थी आत्महत्या करतात आणि हे फक्त विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास नसल्याकारणाने, आई-वडिलांसोबत मैत्रीपूर्ण संबंध नसल्याकारणाने, मुली वरती अत्याचारांचा व इतर कारणाने ही विद्यार्थ्यांची आत्महत्यांची प्रकरण घडत आहेत. या सर्व गोष्टींपासून आपण दूर व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य कसे आनंदी व हसत खेळत जगावे याबद्दल त्यांनी मुलांना समजावून सांगितले. व अमली पदार्थ सेवन करणे किंवा त्याचे देवाण-घेवाण करणे किंवा स्वतःकडे ते ठेवलेले सापडणे या सर्व कार्यावरती कायद्यामध्ये कठोर शिक्षेचे प्रावधान आहे तसेच नाबालिक मुले या प्रकरणांमध्ये सापडतील तर त्यांना सुधारगृहांमध्ये ठेवण्याची तरतूद सुद्धा फायद्यामध्ये आहे असे मुलांना समजावून सांगण्यात आले. त्याचसोबत पुढील शैक्षणिक वाटचाल मुलांनी कशाप्रकारे व यशस्वीरित्या कशी पार करावी व त्यांची स्वप्ने कशी पूर्ण करावी याच्याबद्दल त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या विचारांची देवाण-घेवाण करून उत्तम प्रकारे त्यांना समजावण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी या कार्यशाळेला उत्तम प्रकारे प्रतिसाद भेटला. या कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून भारतीय संस्कृती फाउंडेशन बेळगावचे अध्यक्ष श्रीमती प्रमोदा हजारे, क्रांती फाउंडेशन बेळगावचे उपाध्यक्ष गिरीधर पाटील, जाफर सर, गौरी गजबर, हायस्कूलचे मुख्याध्यापक मिसाळ सर व शिक्षक वर्ग उपस्थित होता. या उपक्रमाची सर्व शिक्षक वर्गणी व विद्यार्थ्यांनी स्तुती केली.