Tuesday , March 3 2026
Breaking News

नियती को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरपर्सन पदी डॉ. सोनाली सरनोबत यांची अविरोध निवड

Spread the love

 

बेळगाव : नुकतीच नियती को-ऑपरेटिव्ह सोसायटीची निवडणुक प्रक्रिया पार पडली. यामध्ये डॉ. सोनाली सरनोबत यांची चेअरपर्सन पदी व श्री. भरत राठोड यांची व्हाईस चेअरमन म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
कोरोना काळात नियती सोसायटीची स्थापना डॉ. सोनाली सरनोबत यांच्या पुढाकाराने करण्यात आली. बेळगांव चेंबर ॲाफ कॅामर्सचे माजी अध्यक्ष श्री. रोहन जुवळी यांनी चेअरमन व प्रख्यात डॉक्टर समीर सरनोबत यांनी व्हाईस चेअरमन म्हणून धुरा सांभाळली व अल्पावधीतच सोसायटी नफ्यात आणली. श्री. अनुप जवळकर (प्रख्यात बिल्डर), श्री. रोहीत देशपांडे (उद्योगपती), श्री. भास्कर पाटील (वकील), श्री. प्रकाश मुगळी (उद्योगपती), श्री. नरसिंह जोशी (कर सल्लागार), श्री. गजानन रामनकट्टी (उद्योजक), श्री. प्रसाद घाडी (उद्योजक), भुषण रेवणकर (उद्योजक), सौ. सुनीता पवार (उद्योजिका), सौ. वरदा हप्पळी (उद्योजिका), सौ. मंजुळा हेगडे (महिला मंडळ समन्वयक) यांची निर्देशक म्हणून निवड झाली आहे. चीफ मॅनेजर सौ. अनुषा जोशी व सौ. दीपा प्रभुदेसाई उपस्थित होत्या.
सल्लागार म्हणून माजी महापौर विजय मोरे, कर सल्लागार संदीप खन्नुकर, सविता कांबळे, नागरत्ना रामगोंडा, किशोर काकडे, मिलींद पाटील, शितल चिलमी यांनी काम पाहिले.
सोसायटीच्या दोन शाखा आहेत. प्रमुख शाखा पी. एन. गाडगीळ गोल्ड शोरूमच्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर असुन दुसरी शाखा फुलबाग गल्लीमध्ये आहे. तिसरी शाखा खानापुरात लवकरच सुरू होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *