
बेळगाव : काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी (दि. 27) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी बचाव पॅनल मधील एस. एल. चौगुले, यल्लोजी पाटील आणि मनोहर होनगेकर, सौं. मालू एम पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
या कारखान्याच्या निवडणुकीसाठी एस. एल. चौगुले, यल्लोजी पाटील आणि मनोहर होनगेकर यांनी शेतकर्यांच्या हितासाठी आणि कारखाना शेतकर्यांच्याच ताब्यात राहण्यासाठी शेतकरी बचाव पॅनेलमधून उमेदवारी दाखल केली होती. पण मतांची विभागणी होऊ नये, यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असून शेतकरी बचाव पॅनेलला जाहीर पाठिंबा देत आहोत. या निवडणुकीत बॅलेट पेपरमधील आमच्या नावासमोर मतदान करण्यात येऊ नये. सभासद मतदारांनी कारखान्याच्या हितासाठी शेतकरी बचाव पॅनेलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतदान करून बहुमताने विजयी करावे. ही नम्र विनंती.
Belgaum Varta Belgaum Varta