बेळगाव : शट्टीहळ्ळी ता. हुक्केरी येथील आदित्य आप्पाजी कालकुंद्रे हा कझाकिस्थान येथे होणार्या जिम्नॅस्टिक्स एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारताकडून प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन आणि त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अदित्य कालकुंद्रे याने मुंबई येथुन जिम्नॅस्टिक्स खेळाला सुरुवात केली आहे. दहावी पर्यंत मुंबई शहरात लहान गटातुन तालुका आणि जिल्हा स्तरात प्रतिनिधित्व करत होता. त्यानंतर मंबई मधिल एका नामांकित स्पोर्टस अॅकॅडेमीतून सरावाला सुरुवात केली. त्याने आतापर्यंत केरळ, गोवा आणि महाराष्ट्रातील मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, पुणे, इस्लामपूर, कोल्हापूर येथील जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सहभागी होऊन त्याने अनेक पदके मिळवली आहेत.
दुर्गम भागातील महाराष्ट्र-कर्नाटक सिमेलगत असणार्या शट्टीहळ्ळी गावातील आदित्य कालकुंद्रे हा जागतिक पातळीवरील स्पर्धेत सहभागी होऊन देशाचे प्रतिनिधित्व करत असल्याने, शट्टीहळ्ळीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. येत्या काही दिवसात आदित्य कालकुंद्रे कझाकिस्थान येथे होणार्या जिम्नॅस्टिक्स एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारताकडून प्रतिनिधित्व करणार आहे. अहमदनगर येथे झालेल्या जिमॅस्टिकच स्पर्धेत यश मिवल्यानंतर त्याची कझाकिस्थान येथे निवड झाली आहे. त्याला अशिस सावंत, राहुल तायडे, जयश्री बामणे, मोहन बामणे, वडिल आप्पाजी कालकुंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta