Sunday , July 26 2026
Breaking News

मंगाई मंदिरासमोरील ‘ती’ भिंत हटविण्याची मागणी; मंगाईनगर रहिवाशांचे मनपाला निवेदन

Spread the love

 

बेळगाव : वडगाव येथील मंगाई मंदिरासमोर भर रस्त्यातच भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे मंगाईनगरला जाणाऱ्या नागरिकांसाठी हे त्रासाचे ठरत आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता होता. मात्र त्यावर बेकायदेशीररित्या भिंत बांधण्यात आली असून तातडीने ती हटवावी आणि ये-जा करण्यासाठी आम्हाला मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी मंगाईनगर रहिवासी संघाच्यावतीने महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडे करण्यात आली.

मंगाईनगर-वडगाव या परिसरात २ हजारांहून अधिक लोकसंख्या आहे. त्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी पूर्वीपासून रस्ता होता. मात्र आता या रस्त्यावर भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णवाहिका, लहान मुले, वृद्धांना तसेच नागरिकांना विष्णू गल्ली, धामणे रोड, ब्रह्मनगर येथून यावे लागत आहे. जवळपास दीड कि. मी. हे अंतर आहे. पूर्वी असलेला रस्ता हा सर्वांना जवळचा संपर्क रस्ता होता. मात्र तो बंद केल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे.

मंगाईनगर येथील दोन तलावाकडे पाटील गल्ली, विष्णू गल्ली, यरमाळ रोड येथील शेतकरी बंधूंना जनावरांना ने-आण करणेदेखील अवघड झाले आहे. मूळ मालक जागा देण्यास तयार आहेत. तेव्हा आम्हाला बांधण्यात आलेले अतिक्रमण हटवून रस्ता खुला करावा, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर मंगाईनगर परिरसतील तसेच आहेत. वडगाव अतिक्रमण हटवून रस्ता खुला परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *