बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूल मुतगे शाळेच्या कुस्ती पटुंनी जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. त्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.
बेळगाव येथील जिल्हा क्रीडांगण येथे या जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये इयत्ता आठवीची विद्यार्थिनी ऋतुजा गुरव 45 किलो वजनी गट, दहावीचे विद्यार्थी प्रज्योत इंगळे 65 किलो वजनी गट आणि आर्यन चौगुले 55 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांची निवड राज्य स्तरीय स्पर्धेसाठी झाली. ऋतुजा गुरव हिने यापुर्वी आयोध्या येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत गोल्ड मिडल, झारखंड येथे सिल्व्हर मिडल, बहाद्दूर येथे ब्रांझ मिडल मिळवले आहे. शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना मुख्याध्यापक बी. बी. कोंडसकोप, माजी सैनिक किसन पाटील, संतोष गुरव यांच्यासह इतर शिक्षक, शाळा सुधारणा समीतीचे मार्गदर्शन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta