Sunday , July 26 2026
Breaking News

टँकरच्या धडकेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव- खानापूर रोडवर रस्ता ओलांडताना पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उद्यमबाग बेंम्को समोर शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
जैरूनबी मोहम्मदसाब चौधरी (वय 74) असे सदर महिलेचे नाव असून ती राजाराम नगर, उद्यमबाग येथे राहणारी आहे. दुकानाला जाण्यासाठी रस्ता ओलांडताना सदर अपघात घडला.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सदर पाण्याची टँकर बेळगावकडून मजगावकडे जात होता. त्यावेळी सदर महिला दुभाजकावरून रस्ता ओलांडत होती. त्यावेळी टँकरने दिलेल्या धडकेत तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात होताच दक्षिण रहदारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व रहदारीस रस्ता मोकळा करून दिला रहदारी पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *