Sunday , September 8 2024
Breaking News

नेताजी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

Spread the love

येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. प्रारंभी चेअरमन डी. जी. पाटील, व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सल्लागार रवींद्र गिंडे, संचालक भरतकुमार मुरकुटे, संजय मजूकर, प्रा. सी. एम. गोरल, गणपती हट्टीकर व के. एन. पाटील यांनी दीपप्रज्वलन केले.
सभेच्या सुरुवातीला संस्थेचे दिवंगत सभासद महेश कानशिडे, शांताबाई गिंडे, बाबुराव कणबरकर, प्रभावती घाडी, सुधीर घाडी, दिलीप मुरकुटे, मुकुंद घाडी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रास्ताविक संचालक संजय मजूकर यांनी केले. यावेळी बोलताना सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील म्हणाले, सहकार क्षेत्रातील चढाओढ व कोरोनाचे संक्रमण यावर सुद्धा मात करत आमच्या संस्थेने ग्राहकाभिमुख व पारदर्शी व्यवहार ठेवल्यामुळे संस्थेने ठेवीदारांचा व कर्जदारांचा विश्वास संपादन केला आहे. सभासदांनी ठेवलेल्या विश्वासामुळेच आमच्या संस्थेकडे आज 21 कोटींच्या ठेवी आहेत तर 5 कोटीची आम्ही गुंतवणूक केली आहे. 14 कोटीच्या वर कर्ज वाटप केले आहे. संस्थेकडे एकूण भाग भांडवल 24 कोटी इतके आहे. तर आमच्या संस्थेची वार्षिक उलाढाल 56 कोटीच्या वर आहे. 21 वर्षाच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय त्यांनी संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांना दिले. नेताजी पतसंस्थेने ठेवलेल्या ग्राहकाभिमुख व पारदर्शी व्यवहारामुळे संस्थेची दिवसेंदिवस प्रगती होत आहे.
यावेळी व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे, संचालक संजय मजूकर, भरतकुमार मुरकुटे, के. एन. पाटील व प्रा. सी. एम. गोरल यांनीही आपले विचार व्यक्त केले. ताळेबंद पत्रकाचे वाचन सेक्रेटरी दीपक हट्टीकर यांनी केले. तर नफा-तोटा पत्रकाचे वाचन चांगदेव मुरकुटे यांनी केले. नफा विभागणीचे वाचन सौ. कांचन पाटील यांनी केले, तर अंदाजपत्रकाचे वाचन सौ. कल्याणी पावले यांनी केले.
यावेळी संचालक सी. एम. उघाडे, किरण गिंडे, मीनाजी नाईक, के. बी. बंडाचे, सौ. अस्मिता पाटील, भोमाणी छत्र्यान्नावर, सल्लागार परशराम गिंडे, के. एन. पाटील, अनिल पाटील, गणपती हट्टीकर, पांडुरंग घाडी, अनिल मुरकुटे, शंकर मुरकुटे, प्रभाकर कणबरकर ,मनोहर देसुरकर, रविकांत पाटील, कर्मचारी रवी कणबरकर, मुक्ता लोहार, नेहा गोरल, दीक्षा नाईक, लता गिंडे, रमा कणबरकर, संगीता दणकारे यांच्यासह भागधारक, सभासद व हितचिंतक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सी. एम. गोरल यांनी केले, तर आभार सल्लागार अनिल पाटील यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *