गोकुळाष्टमी कार्यक्रमात घेतला सहभाग
बेळगाव : मुख्य इस्कॉन मंदिरात कृष्ण जन्माष्टमी साजरी केल्यानंतर आठवडाभर वेगवेगळ्या शाखेत मोठ्या जल्लोषात कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने बुधवारी वाघवडे येथे सकाळपासूनच जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
वाघवडे येथील इस्कॉनच्या राधेकृष्णा मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नुकतेच उदघाटन झालेल्या नविन मंदिराची वेगवेगळ्या फुलांनी सजावट करण्यात आली होती.
लाडूसोबत श्रीकृष्णासमोर दही, पोह्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. याचबरोबर कृष्ण मंदिरांमध्ये भजन, कीर्तन व इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. वेगवेगळ्या भागातून आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)ची भक्तमंडळी यात सामील झाली होती.
यावेळी समितीचे नेते आर. एम. चौगुले, माजी एपीएमसी सदस्य आर के पाटील, मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक जोतिबा आंबोळकर, मदन बामणे यांचा शाल घालून सत्कार करण्यात आला. त्यानंतर सामूहिक आरती झाली.
भगवान कृष्णांच्या जयंतीनिमित्त केक कापण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.