Wednesday , April 22 2026
Breaking News

खानापूर तालुक्यातील सागरे येथे भरदिवसा घरफोडी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यात घरफोडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. समोरील कुलूप बंद दरवाजा पाहून पाठीमागच्या दरवाजाने घरफोडीचे प्रकार घडत असतानाही घरात दागिने पैसे ठेवून कुलूप बंद घरे करून बाहेर जाणे धोक्याचे ठरत आहे. असाच प्रकार बुधवारी खानापूर तालुक्यातील सागरे गावात घडला.

सागरे येथे बंद घरांचे कुलूप तोडून 5 तोळे सोन्याचे दागिने, 15 तोळे चांदी आणि 7000 रुपये लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. गावच्या मध्यवस्तीत असणाऱ्या परशराम पाटील यांच्या घरातील सर्वजण कामानिमित्त बाहेर गेले असताना मागचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. तिजोरीतील अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण, दोन अंगठ्या, पंधरा तोळे चांदी आणि सात हजार रुपये लंपास केले. नंदगड पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला आहे. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करून पाहणी केली असता कोणतेच धागेदोरे हाती लागले नाहीत.

About Belgaum Varta

Check Also

श्री नागेश महारुद्र मंदिर कळसाची शोभायात्रा 20 एप्रिल रोजी

Spread the love  खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य व थळदैवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *