बेळगाव : कर्नाटक सरकारचे विधीमंडळाचे अधिवेशन दि. 13 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने त्याचदिवशी महामेळावा भरविण्याचा निर्धार जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर हा महामेळावा भरविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी म. ए. समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी याठिकाणी महामेळाव्याच्या आयोजनासाठी पाहणी केली. तसेच महामेळाव्याच्या मंडप उभारणीचा शुभारंभ केला. सीमा बांधवांच्या उपस्थितीत महामेळावा यशस्वी करण्याचे निश्चित करण्यात आले.
यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, संतोष मंडलिक, श्रीकांत कदम, सुनील बोकडे, महेश जुवेकर, गणेश दड्डीकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
कै. एम. डी. चौगुले व्याख्यानमालेस २९ डिसेंबरपासून सुरुवात
Spread the love बेळगाव : दरवर्षी मण्णूर येथील “कै. एम. डी. चौगुले सामाजिक आणि शैक्षणिक …