
बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा रविवारी अपूर्व उत्साहात पार पडली. प्रमुख अतिथी म्हणून विचारवंत किशोर काकडे उपस्थित होते. व्यासपीठावर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. व्ही. एन्. जोशी, विभागीय सचिव पांडुरंग नायक, कर्नाटक प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर, संयोजक डाॅ. जे. जी. नाईक, बेळगांव शाखा अध्यक्ष विनायक घोडेकर, रामचंद्र तिगडी, सचिव मालतेश पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
विनायक मोरे यांच्या संपूर्ण वंदे मातरमने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्ष विनायक घोडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वक्ते किशोर काकडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपस्थितांत देशाप्रती राष्ट्रचेतना जागवली. डाॅ. जे. जी. नाईक यांनी “भारत को जानो” स्पर्धेची संकल्पना स्पष्ट करत उत्कृष्ट कार्यक्रम संयोजन केले. सुभाष मिराशी व जया नायक यांनी परीक्षण केले. प्रा.अरूणा नाईक यांनी सूत्रसंचालन केले. एम्. जी. पाटील यांनी आभार मानले.
स्पर्धेचा निकाल- प्रथम क्रमांक प्रणीत भिंगुर्डे व कुबेर रेवणकर (के.एल्.एस्. स्कूल), द्वितीय क्रमांक साईश पाटील व अंशुमन दागा (ज्ञान प्रबोधन मंदिर), तृतिय क्रमांक सहना जाधव व नेत्रा लकुंडी (उषाताई गोगटे हायस्कूल) व उत्तेजनार्थ प्रणव शेट्टी व मुदस्सीर शेख (जी. जी. चिटणीस स्कूल). विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक प्राप्त के.एल्.एस्. स्कूल विद्यार्थ्यांची गंगावती येथे ५ नोव्हेंबर रोजी होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
कार्यक्रमास डाॅ. व्ही. बी. यलबुर्गी, नामजी देशपांडे, सुहास गुर्जर, कुमार पाटील, गणपती भुजगुरव, पी. एम्. पाटील, चंद्रशेखर इटी, कुबेर गणेशवाडी, जयंत जोशी, सुखद देशपांडे, शुभांगी मिराशी, जया नायक, उमा यलबुर्गी, प्रिया पाटील, स्मिता भुजगुरव, विद्या इटी, पूजा पाटील, उषा देशपांडे, अनेक शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta