
बेळगावातील राष्ट्रीय समावेश मेळाव्यात सत्कार स्विकाताना व्यक्त मत
बेळगाव (प्रतिनिधी) : देशातील सर्व समाज एक सारखेच असून, आजपर्यंत आम्हीं कधीही जातीभेद केला नाही. सर्व समाजाला बरोबर घेऊनच चाललो आहोत. सरकार संविधानाच्या चौकटीतच सर्व समाजाना एकच न्याय दिला जाईल, असे सांगत कोणत्याही समाजाने संघटिपणे हक्क मागितला तर त्यात चुकीचे काय असा सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.
बेळगांव येथील नेहरू नगर क्रीडा मैदानावर पार पडलेल्या शेफर्ड इंडिया 9व्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय समावेश मेळाव्यात बोलत होते. एखाद्या समाजात तेढ निर्माण झाल्याने याचा सर्वानाच फटका बसत असतो, त्यामुळे संघटितपणे संविधानाच्या हक्काने लढल्यास नक्कीच न्याय मिळू शकेल. आम्ही जातीभेद करत नाही, सामजिक न्याय मिळवून देणे हे आमचे कर्तव्य असून, सामाजिक कार्यकर्ते राममनोहर लोहिया यांनी एखद्या समाजाने संघटितपणें राहणे असा संदेश दिला आहे. आमच्या समाजाला राजकीय इतिहासाबरोबर सांस्कृतिक भव्यता आहे. हकासाठी लढणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र परखले पाहिजे, याप्रमाणे सर्व समूदाय आर्थिक, सामजिक, राजकीय स्वार्थासाठी वापर नको, प्रत्येकाला योग्य न्याय मिळायला हवा, असे सांगताना टीकाकारांना प्रत्यतुर दीले. यावेळी काहिनेळे कनक पिठाचे श्री श्री निरंजनानंद स्वामीजी, ईश्वरानंदपूरी स्वामीजी, सुध्दरामानंद स्वामीजी, अर्जूनाभावीपुरी स्वामीजी, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, राजपाल भंडारू दतात्रय, शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलचे अध्यक्ष माजी मंत्री एच. विश्वनाथ, केंद्रीय ग्रामीण विकास राज्य मंत्री घगान सिंह कुलास्ते, राज्य बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, नगरविकास मंत्री भैरती सुरेश, गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कावळेकर, महाराष्ट्राचे माजी मंत्री महादेव जानकर, दतात्रय भर्णे, राम शिंदे, शेफर्डचे उपाध्यक्ष एम. रेवणणा, आंध्रचे मंत्री के. व्ही. उशाष्री यांच्यासह विविध समाजाचे नेते, समाज बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta