बेळगाव : आर. पी. डी. महाविद्यालयाचा विद्यार्थी सक्षम जाधव याची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे.
कोल्हापूर क्रॉस येथील स्पोर्ट्स हॉस्टेलच्या सभागृहात सरस्वती पदवीपूर्व कॉलेज आयोजित जिल्हास्तरीय पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या आंतर महाविद्यालयीन कराटे स्पर्धेत सक्षम जाधव याने सुवर्णपदक पटकावून राज्यस्तरावर मजल मारली आहे.
बेळगाव जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन त्याला गौरविण्यात आले.
सक्षमला कराटे प्रशिक्षक दीपक काकतीकर, अमित वेसणे याचे मार्गदर्शन आणि आर. पी. डी. कॉलेजचे प्राचार्य काशीनाथ मेलेद व क्रीडा प्राध्यापक देवेंद्र कुडची यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta