Friday , April 25 2025
Breaking News

शिवसंदेश भारत पंचरत्नांचा शिवाज्ञा सत्कार सोहळा थाटात संपन्न

Spread the love

मराठी तरुणाने उद्योग व्यवसायाकडे वळलं पाहिजे : महादेव चौगुले
बेळगाव (रवींद्र पाटील) : आशादायी व प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचा सत्कार करणे हे समाजाच्या प्रगतीचे द्योतक आहे. सत्कार्य व कर्तृत्वान व्यक्तींच्या पाठीवरती ही कौतुकाची थाप देवून प्रोत्साहन देणे तसेच गुणवंत पाल्यांचा गुणगौरव करून गौरव करणे हे आजच्या काळाची गरज असून ही शिवाज्ञा आहे, असे प्रतिपादन शिवसंत संजयजी मोरे यांनी गौरवोद्गार अध्यक्षस्थानावरून बोलताना काढले.
बेळगाव गणेशपूर येथील यश अ‍ॅटोमोबाईल्सच्या दालनात दि. 10 रोजी बेळगाव येथील शिवसंदेश भारत व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्यावतीने शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून शिवाज्ञा पंचरत्न सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.
महादेव चौगुले म्हणाले, मराठी तरुणाने उद्योग व्यवसायाकडे वळलं पाहिजेत व यशाच्या मागं धावलो पाहिजेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका विद्या पाटील यांनी प्रार्थना सादर केली. येशूबाई युवराज घाडी यांनी शिवआरती सुरेल आवाजात गायली व ’दैवत छत्रपती’ हे शिव गौरवगीत तानाजी पाटील व दिव्यायनी पाटील यांनी संगिताच्या तालावर सुमधूर गायीले आणि वातावरण शिवमय झाले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन उद्योगपती महादेव चौगुले यांनी केले. दिपप्रज्वलन एम. वाय. घाडी व सत्कारमूर्ती यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मोहन के. पाटील यांनी केले आदर्श शिक्षक रणजित चौगुले यांनी सत्कारमूर्तींची परिचय खास विनोदी शैलीतून करून दिली.
बेळगाव जिल्हा लघु उद्योग संघटनेच्या अध्यक्षपदी उद्योगपती महादेव चौगुले यांची निवड झाल्याबद्दल तर बेळगाव बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी अ‍ॅड. सुधीर चव्हाण यांची निवड तसेच बेळगाव जिल्हा लघुउद्योग संघटनेच्या निमंत्रित सदस्यपदी बांधकाम व्यावसायिक युवराज हुलजी यांची नियुक्ती झाल्याबद्दल शिवसंदेश भारत व अभामसा परिषद परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच या परिवाराचे सदस्य अ.भा.म.सा. परिषद कर्नाटक प्रदेश राज्याध्यक्ष रवी पाटील यांना चिक्कोडी येथे आंतरराज्य शैक्षणिक सेवा पुरस्कार व डी. बी. पाटील यांना जिव्हाळा स्नेह पुरस्कार मिळालाबद्दल यांचाही यथाचित सत्कार करण्यात आला.
अभामसा परिषद बेळगाव जिल्हा महिला कार्यकारिणी स्मिता किल्लेकर, प्रा. मनिषा नाडगौडा, रोशनी हुंदरे, नेत्रा मेणसे व धनश्री मुंचडीकर यांनी पुष्परोप सत्कार मूर्तीना देवून गौरविण्यात आले.
गणेशपूर येथील रोहित अर्जुन शिंदे यांने एनडीएमधून भारतीय सैन्यात लेप्टनंट म्हणून थेट पदावर नियुक्ती झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी विशेष गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. प्राचार्य एल. पी. पाटील यांचा चिरंजीव बारावीनंतर नीट परीक्षेत रजत लक्ष्मण पाटील यांनी विशेष प्राविण्यासह यश मिळविले, मुख्याध्यापक एम. के. पाटील यांचा चिरंजीव यश पाटील यांने दहावी परीक्षेत 98% टक्के गुण मिळवून तीन विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आणि शिवसंत संजय मोरे यांचा चिरंजीव बारावी परीक्षेत गणित विषयात 100 पैकी 100 गुण व मिळविल्याबद्दल या तिन्हीं पाल्यांचा व दिव्या नागेश ठोंबरे हिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उद्योजक राजेंद्र मुतगेकर, गोविंददादा पाटील, उद्योगपती महादेव चौगुले व अ‍ॅड. सुधीर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ईश्वर लगाडे, नारायण कणबरकर, राम ठोंबरे, उद्योजक वैभव यादव, संदिप तरळे, संजय गुरव, सरपंच रमेश भोसले, अ‍ॅड. श्याम पाटील, सुभेदार धनाजी मोरे, शिवाजी शिंदे, बाळाराम कदम, शांताराम गुरव व मोहन अष्टेकर, बाजीराव मन्नोळकर, गणेश दड्डीकर यासह शिवभक्त उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल. पी. पाटील व आभार रोशनी हुंदरे यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर महाराष्ट्र मैदानात आंतरराष्ट्रीय कुस्तीला प्रारंभ

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री कलमेश्वर, श्री चांगलेश्वरी व श्री महालक्ष्मी देवी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *