खानापूर (प्रतिनिधी) : शनिवारपासुन खानापूर तालुक्यात पाऊस ओसरला तसे तालुक्यातील रस्ते मोकळे होऊ लागले. असाच रस्ता खानापूर तालुक्यातील चापगाव-यडोगा मार्गावरील मलप्रभा नदीच्या पुलावर नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे भरपूर पाणी आले. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोठ मोठे झाडांचे बुंधे, लाकडाचे ओंढके वाहून येऊन पुलाच्या मुशीमध्ये अडकले. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला मोठा आडथळा निर्माण होऊन पाणी वाढत गेले. मुसळधार पावसामुळे विजेचे खांब, विद्युत तारा सुध्दा पुलावर पडलेल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीला पुल मोकळा करण्यासाठी पूलाची पाहणी करून लोकांना मार्ग खुला करण्यासाठी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश धबले, अर्जुन जीवाई, नागो अंदरे, कुराडे निलजकर, पांडुरंग पाटील, नामदेव आदींनी प्रयत्न केले. तसेच हेस्काॅम खात्याचे सेक्शन ऑफिसर पठाण यांना सूचना करून हेस्काॅम खात्याचे कर्मचारी, ग्रामपंचायत पीडीओ आणि सदस्य नगराज येळ्ळूरकर यांना माहिती दिली व रस्त्यावरची माती काढणे व मोरम टाकण्याबद्दल केली व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी जी. एम. कोमनावर यांनाही परिस्थितीची माहिती देऊन दिवसभरात चापगाव- यडोगा मार्गावरील पूल वाहतुकीला मोकळा करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta