बेळगाव : तणावमुक्त आनंदी जीवन जगण्यासाठी 14416 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून आपल्याला भेडसावत असणाऱ्या मानसिक तणावातून मुक्ती मिळवा, असे प्रतिपादन जिल्हा रुग्णालयाचे मानसिक आरोग्य चिकित्सक डॉक्टर सुनील जबागौडर यांनी मोदगा येथील निर्मला हायस्कूल निर्मल नगर येथे “मानसिक तणावातून मुक्ती” या कार्यक्रमात केले. डी एडिक्शन सेंटर आणि पुनर्वसन केंद्रातर्फे शाळेतील प्रौढ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर डॉक्टर सुनील यांच्यासह सुळेभावी आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. जुबेर हुक्केरी, मुख्याध्यापिका सौ. निर्मला पिंटो, सिस्टर लीना, निर्मल नगर संस्थेचे सहाय्यक फादर प्रवीण, डी एडिक्शन केंद्राच्या संचालिका सिस्टर जेनेट, कॉन्व्हेंट प्रमुख सिस्टर आयरिन, सीजी हॉस्पिटलचे मुख्य अधीक्षक डॉक्टर सिंधू आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला. नशा मुक्ती या विषयावर जनजागृती पर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. डॉक्टर सुनील यांनी मानसिक आरोग्य समस्यांची विस्तारक माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक निंगाप्पा वाकुंडा यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष कोळकर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निर्मल नगर शाळेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta