Sunday , July 26 2026
Breaking News

महिलेचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र लांबवले; महांतेशनगरमधील प्रकार

Spread the love

 

बेळगाव : सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसडा मारून लांबविल्याची घटना शुक्रवारी (दि. १०) रात्री सातच्या सुमारास महांतेशनगरमध्ये घडली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, महांतेशनगरमधील पी अँड टी क्वॉटर्समध्ये राहणाऱ्या शांता जमकी या सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडल्या फिरून त्या घराकडे परतत होत्या. घराजवळ पोचल्यानंतर आत वळतानाच पाठलाग करत चालत आलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राला हिसडा मारून पलायन केले. त्यांनी आरडाओरडा केला. परंतु, सदर भामटा पळून जाण्यात यशस्वी ठरला. यानंतर येथे जमलेल्या जमावाने शांता यांचे सांत्वन करत धीर दिला. माळमारुती ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

चोरी झाल्यानंतर ही बाब कोणाला कळू नये, यासाठीच पोलिसांकडून प्रयत्न सुरू असतात. मंगळसूत्र चोरीला गेल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी पोलिसांकडून आता माध्यमांपासून वृत्त लपवण्याचा प्रकारही होत असल्याचे दिसून येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *