बेळगाव : कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे महामार्गा शेजारील शौचालयाला जाऊन धडकल्यामुळे घडलेल्या अपघातात बेळगावच्या दोघांचा जण जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गदग शहराबाहेरील कळसापूर क्रॉस नजीक हुबळी -होस्पेट राष्ट्रीय महामार्गावर घडली.
अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी प्रवाशांची नावे सिद्धय्या पाटील आणि बाबू तारीहाळ अशी असून हे उभयता बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यामधील रहिवासी होते. त्याचप्रमाणे गंभीर जखमी झालेल्याचे नांव शशी पाटील असे असून त्याला उपचारासाठी गदगच्या कीम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
चालकाने भरधाव वेगात निष्काळजीपणे कार चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे समजते. स्थानिक ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.