बेळगाव : सकाळपासून येळ्ळूरमधील सर्व दुकाने व इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. या बंदमध्ये गावातील सर्वांनी सहकार्य केले. काल मेळाव्याच्या ठिकाणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. दिपक दळवी यांच्यावर शाहीफेकचा भ्याड हल्ला झाला त्या कृत्याचा येळ्ळूरवासियांनी जाहीर निषेध केला.
यावेळी येळ्ळूर विभाग समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी, ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, कार्याध्यक्ष दुदाप्पा बागेवाडी, सचिव प्रकाश अष्टेकर, राजू पावले, परशराम घाडी, मधू पाटील, ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, दयानंद उघाडे, राकेश परिट, परशराम परिट, जयशिंग रजपूत, राजू डोण्याण्णावार, भरत मासेकर, बाळू पाटील, सीरज गोरल, नागेश बोबाटे, बाळू पेटर, अमोल जाधव, प्रकाश घाडी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta