Sunday , December 14 2025
Breaking News

अवकाळी पावसामुळे चलवेनहट्टी येथील शेतकऱ्यांचे नुकसान

Spread the love

 

बेळगाव : अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात सापडलेला असून गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं आणि अखेर काल बरसायला सुरवात केल्याने बळीराजाची धांदल उडाली आहे. पावसाळ्यात पाऊस न लागल्याने विद्युत पंपसेटच्या माध्यमातून रात्री अपरात्री पाणी पुरवठा करुण जगलेल्या भात पिकाची शेतकऱ्यांनी भात कापणी केली आहे. पण ऐनवेळी वातावरणात बदल होऊन पावसाचे संकट शेतकऱ्यावर ओढावल्याने‌ असून भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे पिंजार कुजल्याने वर्षभराचा चारा प्रश्न सुध्दा गंभीर होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठी चिंता लागली आहे. चलवेनहट्टी, हंदिगनूर, अगसगे, कडोली, जाफरवाडी, केदनूर, अतिवाड, बोडकेनहट्टी, म्हाळेनहट्टी या भागातील शेतकऱ्यांची मळणी करण्यासाठी धावपळ उडाली आहे. पावसाच्या भीतीने सगळ्यांची कामं सुरू झाल्याने मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

संत मीरा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सप्तशक्ती संगम व भगवद्गीता जयंती उत्साहात साजरी

Spread the love  बेळगाव : संत मीरा इंग्लिश मिडियम स्कूल, लक्ष्मीनगर, हिंडलगा येथे विद्या भारती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *