Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सीईओची आत्महत्या

Spread the love

 

बेळगाव : कर्मचारी भरती गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय चौकशीचा ससेमिरा लागलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ आयएएस अधिकारी आनंद के. यांनी कॅम्प येथील आपल्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवन संपवले. शनिवार (दि.२५) सकाळी ही घटना घडली असून कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डातील १९ जागांसाठी झालेल्या कर्मचारी भरतीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार सीबीआकडे करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून सीबीआयचे अधिकारी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ व इतर अधिकारी आणि भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करत होते. चौकशीचा ससेमिरा लागल्याने आज सीईओ आनंद के. यांनी टोकाचे पाऊल उचलले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *