Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवारी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सोमवार दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी कर्नाटक सरकारच्या बेळगांव येथील होणार्‍या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात मध्यवर्ती म. ए. समितीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव येथे महामेळावा आयोजित करून कर्नाटक सरकारला आपला विरोध दर्शविणार आहेत. तरी या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी समितीप्रेमी नागरिक व कार्यकारिणी सदस्य, आजी माजी लोकप्रतिनिधींनी वेळेत हजर रहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील व श्री. निरंजन सरदेसाई आणि सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *