
बेळगाव : बैलहोंगल उपायुक्त कार्यालयातील कर्मचारी मंजुनाथ अंगडी 60 हजारांची लाच घेताना लोकायुक्तांच्या जाळ्यात सापडला आहे.
रामदुर्ग तालुक्यातील चिक्कोप्प एसके गावातील रवी अज्जे यांच्याकडे मंजुनाथने जमिनीच्या कागदपत्रात दुरुस्ती करण्यासाठी 60 हजारांची लाच मागितली होती.
याप्रकरणी रवीने बेळगाव लोकायुक्त ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी मंजुनाथ याला जाळ्यात पकडण्यासाठी योजना आखून ठराविक ठिकाणी त्याला बोलाविण्यास रविला सांगितले. व रक्कम स्वीकारताना ताब्यात घेतले. लोकायुक्त एसपी हनुमंतराय, डीवायएसपी बी. एस. पाटील, पीएसआय अन्नपूर्णा हुलागुर यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून मंजूनाथला लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta