येळ्ळूर : ‘नवहिंद सोसायटी’ने सहकार क्षेत्रात गेल्या 30 वर्षात उल्लेखनीय कामगिरी करून जनमाणसात आपले स्थान प्रस्थापित केले आहे. या प्रगतीत सेवकवर्गाचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन नवहिंद सोसायटीने आयोजित केलेल्या ‘स्टाफ काॅन्फरन्स’मध्ये केले.
प्रारंभी सोसायटीच्या महिला कर्मचाऱ्यांनी स्वागतगीत सादर केल्यानंतर व्हा. चेअरमन श्री. अनिल हुंदरे यांनी प्रस्ताविकात संस्थेची माहिती दिली.
सदर ‘स्टाफ काॅन्फरन्स’मध्ये सन 2022-2023 या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरीबद्दल केलेल्या शाखांचे संचालक मंडळाच्या हस्ते गौरव करण्यात आले. यामध्ये हलकर्णी (ता. चंदगड) या शाखेने प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक सदाशिवनगर शाखेला आणि तृतीय क्रमांक हेरे शाखा (ता. चंदगड) उत्तेजनार्थ ढोलगरवाडी शाखा (ता. चंदगड) व अडकूर या शाखेने पटकावला. या शाखांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
असि. जन. मॅनेजर नारायण वेर्णेकर, रिकव्हरी हेड जोतीबा नांदूरकर, संदीप बामणे, सचिन देशपांडे संगीता कुगाजी, इत्यादींनी सोसायटीच्या प्रगतीविषयी भाषणे केली.
‘वकील दिना’निमित्त ऍड. किरण शिंदे, यांचा सोसायटीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी येळ्ळूरचे उदयोन्मुख गायक इंजिनिअर श्री. भुजंग पाटील यांच्या संगीताच्या बहारदार कार्यक्रमाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
याप्रसंगी नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, संचालक उदय जाधव, प्रदीप मुरकुटे, सी. बी. पाटील, संभाजी कणबरकर, श्रीधर धामणेकर, स्नेहलता चौगुले, नीता जाधव, भीमराव पुण्याण्णावर, नवहिंद मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन नारायण जाधव, प्रियदर्शिनी नवहिंद महिला पतसंस्थेच्या चेअरपर्सन माधुरी पाटील, नवहिंद महिला प्रबोधन केंद्राच्या अध्यक्षा नम्रता पाटील, मदन पाटील, जोतीबा शहापूरकर, विवेक मोहिते, दिनेश पाटील, सागर जाधव, रमाकांत देसाई, निलेश नाईक, सुमेश चौगुले, बाबाजी पाटील, शरद गावडे, विनोद पाटील, युवराज शिंदे, महनतेश अलगोंडी व कर्मचारी वर्ग हजर होते.
शेवटी उदय जाधव यांच्या आभारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.