Friday , March 6 2026
Breaking News

पृथ्वीसिंग हल्ला प्रकरणी आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल

Spread the love

 

बेळगाव : भाजपचे पदाधिकारी पृथ्वीसिंग यांच्यावरील हल्ला प्रकरणात बेळगाव ग्रामीणच्या आमदार मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू विधान परिषद सदस्य आमदार चन्नराज हट्टीहोळी (MLC) यांच्यासह 5 जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पृथ्वीसिंग यांच्या तक्रारीवरून एपीएमसी पोलिसांकडून हा गुन्हा नोंदविला.
आमदार चन्नराज यांच्यासह सुजय जाधव, सद्दाम व अन्य दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. शहरातील जयनगर येथील पृथ्वीसिंग यांच्या निवासस्थानी ही घटना सोमवारी घडली होती. पृथ्वीसिंग यांना मारहाण व शिवीगाळ केल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला आहे. जागेच्या भाडेकरारावरून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोमवारी अधिवेशन सुरू असतानाच सायंकाळीच पृथ्वीसिंग यांच्यावर हल्ल्याची घटना घडली. व्हिडिओ व्हायरल करून पृथ्वीसिंग यांनीच या हल्ल्याची माहिती दिली होती. काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. घटनेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यासह स्थानिक भाजप नेत्यांनी हॉस्पीटलमध्ये जाऊन पृथ्वीसिंग यांची भेट घेतली होती. मंगळवारी माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनीही त्यांची भेट घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एपीएमसी पोलिसांनी आमदार चन्नराज यांच्यासह पाच जणांवर गुन्हा नोंद केला, पण याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

About Belgaum Varta

Check Also

राज्याचा अर्थसंकल्प जनतेची दिशाभूल करणारा : भाजप महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत

Spread the love  बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेला कर्नाटक राज्याचा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *