
बेळगाव : ‘नवहिंद सोसायटी’ची कार्यप्रणाली सर्व स्तरातील लोकांसाठी आशादायक आहे. क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात सोसायटीने पतपुरवठा करून सर्वसामान्यांची ‘पत’ वाढवण्याची किमया ‘नवहिंद’ने केलेली आहे. ही संस्था माझ्या ‘आई’सारखी असून मी छ. शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून कार्य करत राहीन, असे उदगार बेळगाव जिल्हा नोटरी संघटनेचे नूतन अध्यक्ष जेष्ठ वकील मान. राजू बागेवाडी यांनी सत्काराला उत्तर देताना काढले.
नवहिंद को-ऑप. सोसायटीवतीने श्री. बागेवाडी यांच्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर यांनी त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
व्हा. चेअरमन श्री. अनिल हुंदरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
याप्रसंगी नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, संचालक उदय जाधव, सी. बी. पाटील, संभाजी कणबरकर, श्रीधर धामणेकर, लॉ. ऑफिसर जे. एस. नांदुरकर, मॅनेजर दिनेश पाटील, महेश जाधव, राजू नायकोजी, अनिल पाटील, वर्षा हन्नूरकर आदि मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta