Wednesday , March 4 2026
Breaking News

पिरनवाडी नगर पंचायतीला ग्रामस्थांचा घेराव

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी नगर पंचायतीकडून मालमत्तांचे कॉम्युटर उतारे देण्यासाठी रहिवाशांकडून हजारो रुपये उकलण्यात येत असल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी आज नगरपंचायतीला घेराव घालून अधिकाऱ्यांना जाब विचारला. बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी ग्राम पंचायतीचा दर्जा वाढवून नगरपंचायतीचा दर्जा दोन वर्षांपूर्वी देण्यात आलाय. मात्र नगरपंचायत झाल्यापासून रहिवाशांच्या समस्या सुटण्याऐवजी त्यात वाढच झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. रस्ते, पाणी आदी सुविधांची वानवा आहे. तशातच विविध कारणांसाठी लागणाऱ्या प्रॉपर्टी कार्ड अर्थात कॉम्युटर उतारे देताना ग्रामस्थांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. एका उताऱ्यासाठी 40 रुपये सरकारी शुल्क असताना 4 ते 5 हजार रुपयांची मागणी करण्यात येत आहे असा आरोप करून आजी-माजी ग्राम पंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आज नगरपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी घेराव घालून अधिकाऱ्यांना जाब विचारला.

यावेळी बोलताना शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले म्हणाले की, पिरनवाडी ग्राम पंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळून काही उपयोग झालेला नाही. लोकांना सुविधा मिळण्याऐवजी त्यांची गैरसोयच अधिक होत आहे. आमदारांनी 40 रुपयांत उतारा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली असतानाही कर्मचाऱ्यांकडून 4 ते 5 हजार रुपयांची मागणी करण्यात येत आहे. याचाच अर्थ आमदारांच्या शब्दालाही ते किंमत देत नाहीत हे सिद्ध झाले आहे. कोणत्या कामासाठी किती सरकारी शुल्क आहे याचा फलक येथे लावावा अशी मागणी त्यांनी केली. पूर्वीप्रमाणेच कर आकारणी करावी आणि आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात यासाठी आम्ही ८ दिवसांची मुदत देत आहोत. त्या मुदतीत मागण्या मान्य केल्या नाहीत तर जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांना भेटून तक्रार करून महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा त्यांनी दिला.

पिरनवाडी ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष पिराजी मुचंडीकर यांनी, गावातील घरे, दुकाने व अन्य मालमत्तांचा टॅक्स तसेच व्यवसाय परवाना शुल्क निश्चिती करण्यापूर्वी ग्रामसभेत ग्रामस्थांची परवानगी घेऊनच त्याचे शुल्क निर्धारित करावे अशी मागणी केली. बाईट
यावेळी अन्य नागरिकांनीही नगरपंचायतीचा कारभार सुधारण्याची मागणी केली. नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.यावेळी पिरनवाडी तसेच नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *