
बेळगाव : सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांनी मंगळवार दिनांक ९ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सीमाभागात कानडी संघटनाच्या वतीने मराठी भाषिकांच्या फलकावर वाढत्या कन्नड सक्तीकरणाविरोधात बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केले आहे.
तरी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी, पदाधिकाऱ्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. सीमाभागातील मराठी भाषिकांनी पुन्हा एकदा मराठी भाषेवरील अन्याय अत्याचार विरोधात लढण्यासाठी आपला मराठी बाणा कर्नाटक सरकारला दाखवावा. यासाठी आपले कोणतेही कार्य बाजूला ठेवून केवळ माय मराठीसाठी मंगळवार दिनांक ९ रोजी सकाळी ठीक ११.०० उपस्थित राहावयाचे आहे, असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर व चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta