बेळगाव : श्रीराम सेना हिंदूस्थान यांच्यावतीने व डॉ. सोनाली सरनोबत यांच्या सहयोगाने आज आनंद नगर, वडगाव येथे डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला श्री शिव मंदिर विश्वस्त मंडळ, आनंद नगर यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचा परिसरातील जवळपास एक हजार लोकांनी लाभ घेतला.
संघटनेचे पदाधिकारी श्रीकांत कुऱ्याळकर, विजय पाटील, बाबू नावगेकर, संदेश माहुले, राजेंद्र बैलूर, युवराज पाटील, भरत नागरोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.चेतन खन्नूकर, राहुल लोहार, संग्राम पाटील, मंजुनाथ शिंदे, सुमित मोरे, राहुल हुब्बळी, अविनाश हुब्बळी, सागर पात्रोट, अजित हुब्बळी, अविनाश हुब्बळी आदी कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
चेतन खन्नूकर, राहुल लोहार, संग्राम पाटील, मंजुनाथ शिंदे, सुमित मोरे, राहुल हुब्बळी, अविनाश हुब्बळी, सागर पात्रोट, अजित हुब्बळी आदी कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta