Wednesday , March 4 2026
Breaking News

मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी व्याख्यानमालेचा लाभ घेऊन दहावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळवावे : आर. एम. चौगुले

Spread the love

 

हिंडलगा : गेल्या सात वर्षांपासून आम्ही मण्णूर येथे कै. एम. डी. चौगुले सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करीत आलो आहोत. मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घेऊन दहावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळवावे असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते आर. एम. चौगुले यांनी केले.
वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थी एकत्र आल्याने विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक आणि कलागुणांना कक्षा रुंदावण्यास मदत मिळते असेही ते म्हणाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. सी. बी. पाटील यांनी मराठी भाषेसाठी अनेक विधायक कार्य करणाऱ्या, सहकार्याच्या भावनेतून नेहमीच खारीचा वाटा उचलणाऱ्या एमडी चौगुले प्रतिष्ठानने व्याख्यानमालेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हातभार लावण्याचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला असल्याचे सांगितले.

सुरुवातीला कै. एम. डी. चौगुले यांच्या प्रतिमेचे पूजन बेळगुंदी साहित्य संमेलनाचे प्रकाश किणेकर यांच्याहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. सी. बी. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या व्याख्यानमालेचे उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी आर. एम. चौगुले यांच्याहस्ते उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
पुढील सहा आठवडे चालणाऱ्या या व्याख्यानमालेच्या पहिल्या रविवारी कन्नड विषयाचे शिक्षक संजीव कोष्टी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी कलमेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक वाय. के. नाईक, एन. के. कालकुंद्री, भरमा चौगुले, मधू चौगुले, नागेश चौगुले, महेश काकतकर, संदीप डोणकरी, नितीन कदम, हायस्कूलचे शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर यांनी तर आभार सुजाता नावगेकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *