Sunday , July 26 2026
Breaking News

सिदनाळ येथील बैलगाडी शर्यतीत राशिवडेच्या आयुष वाडकर यांची गाडी प्रथम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : सिदनाळ येथील ग्रामदैवत श्री. सिद्धेश्वर आणि मायाक्का देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या जनरल बैलगाडी शर्यतीत राशिवडेच्या आयुष वाडकर यांनी व कोल्हापूरच्या स्वप्निल सरनाईक यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून २० हजार रुपयांचे बक्षीस विभागून पटकावले. करंजे येथील यश माने व मुरगुड येथील रामा मांगले यांच्या बैल जोड्यांनी विभागून द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. तासगाव येथील शंकर खामकर व सिदनाळ स्वप्नील आवटे यांच्या बैल जोड्यांनी विभागून तृतीय क्रमांकाचे ७ हजार रुपयांचे बक्षीस मिळवले.
जनरल घोडा -गाडी शर्यतीत सिदनाळ येथील दादा मगदूम यांच्या गाडीने प्रथम क्रमांकाचे ३००१ एक रुपये, शोमीन जमादार यांच्या गाडीने द्वितीय क्रमांकाचे २००१ रुपये आणि समर्थ कोगनोळे यांच्या गाडीने तृतीय क्रमांकाचे १००१ रुपयांचे बक्षीस मिळवले. जनरल घोडा- बैलगाडी शर्यतीत कारदगा येथील नितीन खोत, चिमगाव येथील कुणाल बोरगावे आणि भोज येथील मारुती लोहार यांच्या गाड्यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांकाची ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपयांची बक्षिसे पटकाविली. यात्रा कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शर्यती मैदानाचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. शर्यतीमधील विजेत्यांना राजगोंडा पाटील, अरुण नलवडे, उदय पाटील, रामचंद्र साबळे, रावसाहेब नलवडे, रावसाहेब मगदूम, नामदेव नेजे, भरत कलाजे यांच्यासह यात्रा कमिटी पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. दुपारी गावातील प्रमुख मार्गावरून ढोल वाद्याच्या गजरासह भंडाऱ्याच्या उधळणीत सिद्धेश्वर आणि मायाका देवीच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये यात्रा कमिटी सदस्यासह ग्रामस्थांनी भाविक सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *