Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावात एकाच वेळी १२०० शाळांमध्ये बाल हक्क आणि कायद्याची जनजागृती

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच बालकांच्या कायदेशीर हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी ७ मार्च रोजी भव्य अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी दिली आहे. या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान दिले जाणार आहे.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या मोहिमेची रूपरेषा मांडली. ७ मार्च रोजी बेळगावमधील टिळकवाडी येथील केएलएस संस्थेत या कार्यक्रमाचे उद्घाटन न्यायमूर्ती जयंत बॅनर्जी यांच्या हस्ते होणार आहे. त्याच दिवशी जिल्ह्यातील सुमारे १२०० माध्यमिक शाळांमध्ये एकाच वेळी पोक्सो कायदा, बालविवाह प्रतिबंध आणि बालकामगार पद्धतीविरुद्ध कायदेशीर जनजागृती केली जाईल. यासाठी ६५ न्यायाधीश, ज्येष्ठ वकील आणि स्वयंसेवक विविध शाळांना भेटी देऊन मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मंजुनाथ नायक यांनी दिली.येत्या १४ मार्च रोजी जिल्हाभरात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तडजोडीसाठी सुमारे २८,००० खटले निवडण्यात आले असून त्यांच्या सुनावणीसाठी ८५ पीठे तयार करण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राबवल्या जाणाऱ्या या ९० दिवसांच्या अभियानात वकील मध्यस्थी करतील आणि दोन्ही पक्षांमधील सामंजस्याने प्रलंबित खटले निकाली काढले जातील, असे मंजुनाथ नायक यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *