Sunday , July 26 2026
Breaking News

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या १० ते १२ दिवसांपासून पांढऱ्या रंगाची महाराष्ट्र पासिंगची कार संशयास्पद स्थितीत उभी आहे. ही कार कोणाची आहे आणि ती येथे कशी आली, याबाबत कोणालाही माहिती नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंदिराच्या पवित्र परिसरात इतके दिवस अनोळखी वाहन उभे असल्याने अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. या वाहनामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन ही कार ताब्यात घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वाहनाच्या मालकाचा शोध घेऊन मंदिर परिसर रिकामा करावा आणि गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी विनंती स्थानिक नागरिकांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *