
बेळगाव : रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही कौतुकाची बाब आहे. यातून सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळते.
महिला वर्ग अधिकाधिक सहभागी झालेल्या आहेत. अशा स्पर्धांमध्ये भाग घेतल्याने आत्मविश्वास निर्माण होतो. श्रीप्रभू रामाची हुबेहूब प्रतिकृती विविध रंगछटातून साकार करण्यासाठी कल्पकता वापरून चांगला प्रतिसाद मिळाला. हेच या स्पर्धेचे खरं यश आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ कवी निवृत्त शिक्षक वाय. पी. नाईक यांनी शिवाजी काॅलनी टिळकवाडी येथे रांगोळी स्पर्धा बक्षीस समारंभात व्यक्त केले.
प्रारंभी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर श्रीकांत फगरे, नगरसेवक आनंद चव्हाण, नगरसेवक नंदू मिरजकर, उद्योजक महेश फगरे, यशोधन जैन, सागर भोसले, पवन कांबळे, संतोष दळवी, मनोज खांडेकर, मोहन पोटजाळे, प्रणय शेट्टी, किशोर पोटजाळे, प्रशांत पवार, विक्रम कदम, नितीन गोडसे, स्वप्नील पाटील, विनायक धामणेकर, शिरीष चौगुले, श्रीकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

स्पर्धेचे विजेते शिवाजी काॅलनी टिळकवाडी प्रथम क्रमांक – कु. मनस्वी खांडेकर, द्वितीय – स्मिता शिंदे, तृतीय – अक्षता कांबळे, चतुर्थ – तेजस्विनी मोदगेकर, पाचवा – स्मिता पोटजाळे तसेच शांती नगरमधील विजेते
प्रथम क्रमांक – काजल हंगल, द्वितीय – कु. दिया बणसकर, तृतीय – सौ. उमा परदेशी, चौथा क्रमांक – कार्तिकी कार्वेकर व निकिता जाधव, पाचवा क्रमांक – कित्तुर निकिता या यशस्वी विजेत्यांना नगरसेवक आनंद चव्हाण यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी नगरसेवक आनंद चव्हाण, नगरसेवक नंदू मिरजकर, नितीन गोडसे यांनी मनोगत व्यक्त केले. या रांगोळी स्पर्धा श्री छत्रपती युवक संघटना, शिवाजी काॅलनी टिळकवाडी यांनी आयोजित केल्या होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta