Monday , September 21 2026
Breaking News

‘महात्मा बसवेश्वर’ संस्थेमध्ये श्रीराम प्रतिमा पुजन कार्यक्रम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : येथील चिक्कोडी रोडवरील श्री.महात्मा बसवेश्वर क्रेडिट सोहार्द संस्थेच्या मुख्य शाखेमध्ये श्रीराम प्रतिमापूजन करण्यात आले.
प्रारंभी महात्मा बसवेश्वर व सिध्देश्वर स्वामीजींची प्रतिमा पूजन संचालकांच्या हस्ते झाले. संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी म्हणाले, संस्थेमध्ये व सर्व शाखेमध्ये रामराज्याप्रमाणे कार्य व्हावे. ज्यामुळे सर्व ग्राहकांना त्यांचा फायदा होऊन त्यांच्या कुटुंबाला पण शांती व समाधान लाभो. जगामध्ये भारत देशाची प्रगती होण्यासाठी श्री रामाचा आदर्श प्रत्येकांने घ्यावा. यामुळे जागामध्ये सुध्दा कांती होईल. सध्या सुरू असलेली सर्व युध्दे थांबतील व जगामध्ये शांतता लाभेल असे सांगितले.
यावेळी आयोध्येतील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शेट्टी, संचालक डॉ. एस. आर. पाटील, किशोर बाली, प्रताप पट्टणशेट्टी, श्रीकांत परमणे, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, सदानंद दुमाले, प्रताप मेत्राणी, पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सदाशीव धनगर, दिनेश पाटील, संस्थेचे सीईओ शशिकांत आदन्नावर त्यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *