Wednesday , March 4 2026
Breaking News

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना आवाहन

Spread the love

 

येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने परिसरातील तसेच तालुक्यातील विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे की प्रतिवर्षी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये सीमाभागात दहावी परीक्षेत मराठी विषयात सन 2022-23 सालात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला रोख रक्कम व स्मृतिचषक देण्यात येतो, त्याचबरोबर येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालय केंद्रामध्ये दहावी परीक्षेत सन 2022-23 सालात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आलेले विद्यार्थी तसेच श्री शिवाजी विद्यालय केंद्रात मराठी विषयात प्रथम, द्वितीय, तृतीय आलेले विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापक वाय. एन् मेणसे यांच्याकडून तसेच बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर किरण धामणेकर यांच्याकडून बक्षीसे दिले जातात. नंबर मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रतिवर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाचा सही व शिक्का घेऊन श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर यांच्याकडे 31 जानेवारी 2024 पर्यंत जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *