Sunday , July 26 2026
Breaking News

येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन साजरा

Spread the love

 

येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचा 24 वा वर्धापन दिन सोसायटीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष डी. जी. पाटील हे होते. सोसायटीचे अध्यक्ष डी. जी. पाटील व उपाध्यक्ष रघुनाथ मुरकुटे यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संचालक संजय मजूकर यांनी श्रीफळ वाढविले.

यावेळी बोलताना सोसायटीचे अध्यक्ष डी. जी. पाटील म्हणाले, गेल्या 23 वर्षांपूर्वी म्हणजेच 2001 साली आम्ही नेताजी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना स्वातंत्र सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून केली होती, आज आमच्या सोसायटीला 24 वर्षे पूर्ण होत आहेत. संस्था दिवसेंदिवस प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडत आहे, संस्थेचे संचालक मंडळ, सभासद, व हितचिंतक तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे व झोकून देऊन काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्थेने अल्पावधीतच गरुडझेप घेत येळ्ळूर व परिसरात आपला नावलौकिक मिळविला आहे. वडगाव व बापट गल्ली येथे आमची शाखा आहे, संस्थेने येळ्ळूर व वडगाव येथे आपल्या स्वतःच्या इमारती उभ्या केल्या आहेत, तसेच नेताजी युवा संघटनेच्या वतीने नेताजी मराठी संस्कृतीक भवनची उभारणी करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. नेताजी युवा संघटनेच्या वतीने वेळोवेळी अनेक सामाजिक उपक्रमही राबविले जातात. यावेळी संचालक संजय मजूकर, प्रा. सी. एम. गोरल, सल्लागार के. एन. पाटील, परशराम गिंडे, शंकर मुरकुटे, गणपती हट्टीकर, प्रभाकर कणबरकर, वसंत मुचंडी, रविकांत पाटील सेक्रेटरी दीपक हट्टीकर, चांगदेव मुरकुटे, रवि कणबरकर, विजय धामणेकर, सौ. कांचन पाटील, ज्योती यरमाळकर, वैष्णवी मुरकुटे, संगीता दणकारे, आदि यावेळी उपस्थित होते. प्रस्ताविक के. एन. पाटील यांनी केले. तर आभार प्रा. सी. एम. गोरल यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *