बेळगांव (वार्ता) : अनगोळ येथील संतमीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना आयोजित संतमीरा शाळेच्या 40 वर्षंपुरती निमित्त बेळगाव शहर शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धांना शनिवार ता. 18 डिसेंबरला संतमीरा शाळेच्या मैदानावर प्रारंभ झाला. सदर स्पर्धेत 500 हून अधिक शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता.
उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मंगला अंगडी, बेळगाव महानगरपालिकेच्या उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, संत मीरा शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, पुरस्कर्ते विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, हनुमान स्पोर्ट्सचे संचालक आनंद सोमनाचे, अस्मिता इंटरप्राईजेसचे संचालक राजेश लोहार, समाजसेविका माधुरी जाधव, क्रीडा भारतीचे राज्य सचिव अशोक शिंत्रे, जिल्हा संयोजक विश्वास पवार, माध्यमिक शिक्षक संघटनेचे बेळगाव सचिव उमेश कुलकर्णी, खजिनदार सुरेश कल्लेकर, संतमीरा शाळेच्या उपमुख्याध्यापक ऋतुजा जाधव, स्पर्धा अध्यक्ष विवेक पाटील, सचिव चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती ओमकार भारत माता फोटो पूजन व दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी शालेय शिक्षिका अमृता पेटकर, प्रीती कोलकार, उषा पालनकर यांनी शालेय प्रार्थना गायली तर गावडे यांनी प्रास्ताविक केले. आयुक्त भाग्यश्री हुग्गी, खासदार मंगला अंगडी, परमेश्वर हेगडे यांनी शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धा आयोजन केल्याबद्दल टिळकवाडी व संतमीरा शाळेचे अभिनंदन केले व सहभागी शिक्षकांना हीच स्पर्धा प्रेरणादायी असणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते ठळकवाडी शाळेचे वरिष्ठ क्रीडाशिक्षक विवेक पाटील यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर पाहुण्यांच्या हस्ते व्हॉलीबॉल, थ्रोबॉल व वैयक्तिक खेळाच्या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापक राजू कुडतूकर, एन. ओ. डोनकरी, गजानन सावंत, विठ्ठल पाटील, गायत्री शिंदे, सविता जे. के., अलका जाधव, सावित्री नाईक, मंजुनाथ गोळीहळ्ळी, सुरेश कळ्ळेकर, क्रीडाशिक्षक शंकर कोलकार, एस. आर. सिंगाडे, उमेश बेळगुंदीकर, उमेश मजुकर, प्रवीण पाटील, अर्जुन भेकणे, जयसिंग धनाजी, सचिन कुडची, महेश हगीदळी, दत्ता पाटील, बी. जी. सोलोमन, नागराज भगवंतण्णावर, पुजा मुचंडी, अंकिता पाटील, मयुरी पिंगट, चंद्रकांत तुर्केवाडी, बसवंत पाटील आदी उपस्थित होते. सदर स्पर्धत शहरातील विविध शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक मोठ्या उत्साहाने भाग घेत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता पाटणकर आशा कुलकर्णी तर गीता वर्पे यांनी आभार मानले.