Tuesday , March 3 2026
Breaking News

अपघातातील जखमी विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : महिन्याभरापूर्वी ब्रम्हनगर क्रॉस जवळ दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या सौ. दिव्या सुजय पाटील (वय २४) रा. महावीर नगर उद्यमबाग यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
१ जानेवारी रोजी ब्रम्हनगर क्रॉस जवळ झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचाराचा उपयोग न झाल्यामुळे आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, सासरे, सासू, नणंद असा परिवार आहे. चन्नेवाडी ता. खानापूर येथील रहिवासी दिलीप पाटील यांची कन्या तर धनंजय पाटील पुतणी होय.

काही महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *