Monday , September 21 2026
Breaking News

१६ फेब्रुवारीचा अर्थसंकल्प पुढे ढकला

Spread the love

 

भाजपचे राज्यपालाना निवेदन; पोटनिवडणुक व अर्थसंकल्प एकाच दिवशी

बंगळूर : राज्यात काँग्रेस सरकार आल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री सिद्धरामय्या १६ फेब्रुवारी रोजी २०२४-२५ या वर्षाचा पूर्णवेळ अर्थसंकल्प सादर करत आहेत. मात्र, त्याच दिवशी बंगळुर शिक्षक मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. मात्र, हे लोकप्रतिनिधी कायद्याच्या विरोधात असल्याचे सांगून भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना यापैकी एक रद्द करण्याची विनंती केली आहे.
माजी उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वत्थनारायण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन शिक्षक मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तारीख किंवा राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाची तारीख पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती केली. २०२४-२५ चा अर्थसंकल्प आणि शिक्षकांच्या पोटनिवडणुका एकाच दिवशी होत आहेत. निवडणुकीच्या दिवशी आचारसंहिता असली तरी सरकारने अर्थसंकल्पात काही घोषणा करून पोटनिवडणुकीत आपले उमेदवार विजयी करण्याचा डाव रचला आहे. हे लोकप्रतिनिधी कायद्याच्या विरोधात असल्याचे सांगत भाजप नेत्यांनी सरकारविरोधात राज्यपालांकडे तक्रार केली आहे.
राज्यपालांकडे तक्रार सादर केल्यानंतर माध्यमांशी बोलताना माजी उपमुख्यमंत्री अश्वत्थनारायण यांनी सांगितले की, भारतीय निवडणूक आयोगाने बंगळुर शिक्षक मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. मात्र, याच तारखेला राज्य सरकार सन २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करत आहे. मात्र, निवडणुकीच्या दिवशी अर्थसंकल्प सादर झाल्यास त्याचा थेट परिणाम निवडणुकीवर होणार आहे. त्यामुळे भाजपने राज्यपालांची भेट घेऊन निवडणुकीच्या दिवशी अर्थसंकल्प सादर करू नये, अशी विनंती केली. राज्यपालांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून सरकारला कळवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *