बेळगाव : गांधीनगर किल्ला खंदकापासून ते बळ्ळारीपर्यंत जोडणाऱ्या कालव्यातून गवत व झाडे झुडपे, वाढल्याने शिवारात पाणी जाऊन शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या नाल्याची खोदाई करावी यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, तालुकाध्यक्ष सुनील जाधव, सुनील खनुकर यांनी पाठपुरावा केला होता.
शेतकऱ्यांच्या नुकसानीमुळे हा नाला स्वच्छ करण्याची गरज लक्षात घेऊन नारायण सावंत, सुनील जाधव, सुनील खनुकर यांनी लोकसहभागाची हाक दिली. पहिल्या टप्प्यातच त्यांच्या हाकेला शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच शेतकऱ्यांना आपल्या शिवारात काम असल्याने उर्वरित नाला मंजूर लावूनच हा नाला स्वच्छ करण्यात आला.
स्वच्छता मोहिमेत उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. या मोहिमेत शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. तसेच सुमारे 60 ते 70 टन झाडे झुडपे, काढून टाकण्यात आला.
गांधीनगरातून वाहणारा नाला स्वच्छता मोहिमेत विविध अंतरावर पाच टप्पे करण्यात आले होते. या पाचही ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासूनच शेतकरी आणि मंजुर नाला स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करत होते.
या कालव्याच्या पूर्वेकडील बाजूने सफाईला सुरुवात करण्यात आली. बेळगाव शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे काम सुरू करण्यात आले सध्या पावसाळा असल्यामुळे मंजूर लावूनच हे काम केले जात आहे. या कालव्यामध्ये झाडे झुडपे, गवत वाढल्याने तसेच शिवारात पीक असल्याने त्या कालव्यामध्ये जेसिबी किंवा हिटाची उतरणे अवघड झाले आहे. या खंदकाचे पाणी बळ्ळारी नाल्याला जात आहे मात्र कालवा बुजून गेल्यामुळे शिवारातील आजूबाजूच्या शेतात पाणी जाऊन शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.
तसेच नाल्यामध्ये जिथपर्यंत जाणे शक्य होते, तिथपर्यंत कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून सफाई केली. नाल्यामधील प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, पिशव्या, झाडांच्या फांद्या बाहेर काढल्या गेल्या. त्याचबरोबर नाल्याच्या दोन्ही बाजूस जमा झालेला कचरा उठाव करण्यात आला.
यावेळी नारायण सावंत, सुनील जाधव, सुनील खनुकर, उमेश पाटील, लक्ष्मण मनोळकर, राहुल मोरे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.