Friday , October 18 2024
Breaking News

कॅपिटल वन आंतरराज्य एकांकिका स्पर्धा उद्यापासून

Spread the love

 

बेळगाव : उत्कट व एकजिनसी परिणाम साधणारा एक अंकी नाट्यप्रकार म्हणजे एकांकिका. कॅपिटल वन या संस्थेतर्फे एकांकिका या प्रकारात प्रवाही परंपरा निर्माण करण्याचे कार्य सुरु आहे. बेळगावच्या वैभवशाली नाट्य परंपरेला चालना देण्यासाठी कॅपिटल वन संस्थेतर्फे शनिवार दि. 3 आणि रविवार दि. 4 रोजी आंतरशालेय व आंतरराज्य एकांकिका स्पर्धा कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरात आयोजित करण्यात आली आहे.

नाट्यरसिकांना दर्जेदार एकांकिकाची मालिका अनुभवयास मिळावी या हेतूने संस्थेने आभासी तत्वावर निवड प्रक्रिया राबवून दिग्गज संघांची यामध्ये निवड केली आहे. शनिवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते पूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रात जिल्हा मर्यादित आंतरशालेय स्पर्धा झाल्यानंतर आंतरराज्य एकांकिका स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत कॅपिटल वन एकांकिका स्पर्धेच्या चषकांचे अनावरण करण्यात येणार आहे. रविवार दि. 4 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत एकांकिका सादर होणार असून यानंतर बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

नीटनेटकेपणा, काटेकोर वेळेच्या नियोजनबरोबरच अनुभवी परीक्षक व निकालाबद्दलची पारदर्शकता यामुळे स्पर्धेने नाट्य क्षेत्रात एक वेगळे वलय निर्माण केले आहे. प्रदीर्घ काळ संस्थेने चालविलेल्या या नाट्य प्रपंचामुळे नाट्यरसिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, विविध राज्यातून कलाकारांनी सादर केलेल्या नाट्याविष्करामुळे आंतरराज्य स्तरावर सांस्कृतिक देवाण घेवाणीस वाव मिळत आहे आणि यामुळेच नवीन कलाकार, लेखक, दिग्दर्शक निर्माण होण्याचा उदात्त हेतू सफल होताना दिसत आहे. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे आणि चोखंदळ नाट्यरसिकांना दर्जेदार एकांकिकाची मालिका पाहता यावी यासाठी एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या आहेत, अशी माहिती संस्थेचे चेअरमन शिवाजी हंडे यांनी दिली.

एकांकिका आणि संघ पुढीलप्रमाणे
शनिवार दि. तीन रोजी सकाळी 10.30 वाजता आंतरशालेय गटात आप्पलपोटे (एसकेई सोसायटी ठळकवाडी हायस्कूल), सकाळी 11.20 वाजता ब्लू व्हेल आणि व्हाईट सोजेस (अमृता क्रिएशन्स), दुपारी 12.10 वाजता आणि झाडे डोलू लागली (मराठी विद्यानिकेतन), दुपारी 3 वाजता अजब लोठ्यांची महान गोष्ट (वरेरकर नाट्य संघ) या एकांकिका सादर होणार आहेत. आंतरराज्य गटात शनिवार दि. तीन रोजी दुपारी एक वाजता अत्त दीप भव (अथर्व सांगलीकर एंटरटेनमेंट सांगली), दुपारी 4 वाजता लिअर (संगीत व नाट्य विभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), 5 वाजता सत्य (क्रुसेडर्स थिएटर बेळगाव), 6 वाजता लेबल (निमिंती नाट्य संस्था, सातारा), 7 वाजता मेड फॉर इच आदर (प्रोसेस इन थिएटर व आरपीडी महाविद्यालय बेळगाव), तर रविवार दि. 4 रोजी सकाळी 10 वाजता इम्युुनो कॉम्प्रोमाइज (अभिरुची कोल्हापूर), 11 वाजता विषण (राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर), 12 वाजता चिनोबा (निष्पाप कलानिकेतन इचलकरंजी), 1 वाजता फिनिक्स (नाट्यशुभांगी जयसिंगपूर), दुपारी 3 वाजता कूपन (रंगयात्रा इचलकरंजी), 4 वाजता संपर्क क्रमांक (कलासक्त मुंबई), 5 वाजता बिईंग अँड नथिंग (गायन समाज देवल क्लब कोल्हापूर), 6 वाजता इंटररोगेशन (क्रिएटिव्ह कार्टी, मुंबई) या एकांकिका सादर होणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

वैश्यवाणी समाजातर्फे कोजागिरी पौर्णिमा साजरी

Spread the love  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैशवाणी समाजातर्फे बुधवारी रामनाथ मंगल कार्यालयात कोजागिरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *