
बेळगाव : आजकाल कॉलेजेसचे री-युनियन अर्थात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा ही सर्वसामान्य बाब झाली आहे.
मात्र री -युनियनचा आनंद लुटल्यानंतर शिल्लक निधीचा समाज हितासाठी विनियोग सर्वांना छोटे समाधान देऊन जातो. हेच ए. एम. शेख होमिओपॅथिक कॉलेजच्या 1992 च्या बॅचने गरजू विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वाटप करण्याद्वारे दाखवून दिले आहे.
ए. एम. शेख होमिओपॅथिक कॉलेजचे माजी विद्यार्थी असलेले बेळगावातील सुप्रसिद्ध डॉ. योगेश सबनीस, डॉ. सरनोबत आणि डॉ. समीर सरनोबत यांनी आपल्या कॉलेजच्यावतीने तीन गरजू विद्यार्थिनींना प्रत्येकी 6 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देऊ केली.
कोरोना काळात पितृछत्र हरपलेली अंकिता पाटील यांची मुलगी, वडील दृष्टीहीन असलेली सृष्टी बडमंजी आणि अत्यंत सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेली साक्षी चौगुले अशी संबंधित लाभार्थी विद्यार्थिनींची नावे आहेत.
शाळा कॉलेजेसचे री -युनियन किंवा कौटुंबिक सोहळा साजरा केल्यानंतर आपण सामाजिक बांधिलकी देखील जपली पाहिजे, यासाठी हे एक उदाहरण आहे.
Belgaum Varta Belgaum Varta