Friday , April 17 2026
Breaking News

व्हॅलेंटाईन डे निमित्त गिफ्ट शॉपीमध्ये लगबग

Spread the love

 

तरुणाईचा उत्साह शिगेला : गुलाबाचे दरही भडकले

निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्यापासून निपाणी परीसरातील तरुणाई ‘व्हॅलेंटाईन डे’ साठी सज्ज झाली आहे. व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट देण्यासाठी तरुणाईची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. शहरासह परिसरात गुलाब फुलाची आवक वाढली असून गिफ्ट शॉपीतही युवक-युवतींची लगबग सुरू आहे.
शहर आणि परिसरातही चौकाचौकांत व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तरुणाईची येत असल्याचे चित्र आहे. कोण नवे कपडे परिधान करत ‘इम्प्रेशन’ टाकण्याचा प्रयत्न करतो, तर कोणी मित्राकडून बाईक घेऊन ‘शायनिंग’ मारण्याचा प्रयत्न करतो. हा सारा आटापिटा असतो. ते तिला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी. यंदा उत्साहात हा दिवस साजरा करण्याचे नियोजन तरुणाईने केले आहे.
व्हॅलेंटाईन डे पूर्वी रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे… असे विविध डे साजरे करण्यातून प्रेमाचे नाते घट्ट करण्यात आले.
आकर्षक ग्रिटिंग कार्ड, डेडीज आणि बरचं काही निवडण्याचा प्रयत्न तरूणाईचा सुरू आहे. दुसऱ्या बाजूला कॅफे, हॉटेलमध्ये राऊंड टेबल बुक करत ‘ट्रीट’ देत प्रेम व्यक्त करण्याचे प्लॅनिंगही तरुणाईकडून सुरू आहे.
प्रेमाचे प्रतीक असलेल्या गुलाबाच्या फुलास महागाईचे काटे टोचत आहेत. व्हॅलेंटाइन सप्ताहात गुलाबाचे दर वाढले आहेत. ५ रुपयांना मिळणारे फूल १० ते १५ रुपयास मिळत आहे. तरुण-तरुणी विशेषतः महाविद्यालयीन तसेच प्रेमियुगल प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाइन डेची आतुरतेने वाट पाहत आहेत. बुधवारी (ता. १४) व्हॅलेंटाईन डे साजरा होत आहे. उच्च दर्जाचे पॉलिहाऊस मधील गुलाब ८ ते १० रुपयापर्यंत मिळत होते. सध्या २० ते २५ रुपयापर्यंत विक्री होत आहे.

—————————————————————-

‘सध्याच्या आधुनिक युगातही विविध सणांच्या निमित्ताने भेटकार्ड शुभेच्छारुपी देण्यासाठी नागरिक खरेदी करत आहेत. त्यामध्ये सात दिवसाचे सात कार्ड, युवकाकांसाठी ब्रेसलेट अशा नानाविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवले आहेत. यंदा तरुणाईचा उत्साह वाढला असून दोन दिवसापासून शुभेच्छा पत्रांची खरेदी होत आहे.’
– सुयोग कोठारी, शुभेच्छापत्र विक्रेते, निपाणी.

About Belgaum Varta

Check Also

सांगली जवळील मांगले संघ ‘अरिहंत’ चषकाचा मानकरी

Spread the love  कोल्हापूरचा संघ उपविजेता; नारायणवाडी, हिंडलगा विभागून तृतीय क्रमांक निपाणी (वार्ता) : बोरगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *