Monday , September 21 2026
Breaking News

म्हसोबा मंदिराच्या विकासासाठी प्रयत्नशील

Spread the love

 

सहकारत्न उत्तम पाटील : बोरगाव येथे म्हसोबा यात्रा

निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील उपनगरात असलेल्या तळवार कोडीमधील म्हसोबा मंदिर विकासासाठी अरिहंत समूहाकडून नेहमीच सहकार्य मिळाले आहे. त्याचबरोबर नगरपंचायतीच्या विशेष अनुदानातूनही या ठिकाणी रस्ते पथदीप,पाण्याची सोय केली आहे. भविष्यात या मंदिराच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे मत सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
बोरगाव येथे म्हसोबा मंदिर यात्रेनिमित्त आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
मंदिराचे पुजारी प्रकाश कोळी यांनी स्वागत केले.
यावेळी पृथ्वीराज पाटील, नगरसेवक अभयकुमार मगदूम, तुळशीदास वसवाडे, बाबासाहेब कोळी, बापू कोळी, रावसाहेब कोळी, लक्ष्मण वसवाडे, अनिल गुरव, संदीप पाटील, नेताजी महाजन यांच्यासह मंदिर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *