बेळगाव (वार्ता) : उर्वरित वेतन त्वरित द्यावे, यासह विविध मागण्यांचा आग्रह करत बेळगाव जिल्ह्यातील ग्राम पंचायत कर्मचार्यांनी आंदोलन छेडले. ग्राम पंचायत कर्मचार्यांना सरकारी निधीतून वेतन देण्याचा आदेश देण्यात आला आहे. एकूण 8 महिन्यांचे वेतन देण्यात आले असून उर्वरित 4 महिन्यांचे थकीत वेतन यासह 12 ते 15 महिन्यांचे थकीत वेतन अद्याप न देण्यात आल्याने, जिल्हा पंचायत स्तरावरील कर्मचार्यांनी आंदोलन छेडत जिल्हा पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले.
यासंदर्भात राज्य ग्राम पंचायत कर्मचारी संघटनेचे बेळगाव जिल्हा समितीचे प्रधान सचिव जी. एम. जैनेखान यांनी माहिती देताना सांगितले की, सध्या मोठ्या प्रमाणात दरवाढीचा सामना करावा लागत आहे. दरवाढीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपल्याला 21 ते 24 हजार रुपये इतके मूळ वेतन देण्यात यावे, त्याचप्रमाणे वेतनाची रक्कम थेट कर्मचार्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, जलव्यवस्थापन, स्वच्छता यात आरक्षण मिळावे, ज्येष्ठ कर्मचार्यांची यादी प्रकाशित करून बढती मिळावी, कोविड नुकसान भरपाई, यासह अनेक मागण्यांच्या आग्रहासाठी आंदोलन छेडण्यात आले आहे, असे जैनेखान म्हणाले.
कर्मचारी आंदोलकांनी जिल्हा पंचायत सीईओना निवेदन सादर केले. यावेळी राज्य ग्राम पंचायत कर्मचारी संघटनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष व्ही. पी. कुलकर्णी, पदाधिकारी वीरभद्रप्पा कंम्पली, मुडेप्पा भजंत्री, यल्लाप्पा नायक, दुंडाप्पा भजनायक, जयानंद पाटील, संतोष नायक, विठोबा बुत्तेवाडकर आदींसह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.
Check Also
राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेची हिंडलगा, येळ्ळूर व खानापूर केंद्रावरील तयारी पूर्ण
Spread the love येळ्ळूर : ८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य मंचच्या वतीने रविवार दि. …